Terms of Use

नियम व अटी:

1 . सदस्यत्वाचे नूतनीकरण अनिवार्य आहे अन्यथा योजनेच्या कालावधीनुसार प्रोफाइल वेबसाइटवरून काढून टाकले जाईल.
2 . मी स्वेच्छेने विवाह नोंदणी करू इच्छिणाऱ्याला सर्व गोष्टींची कल्पना देऊन आणि त्यांची संमती घेऊन नोंदणी करत असून विवाहा संबंधीची सर्व जबाबदारी माझी राहील.
3 . एका महिन्यात फक्त 10 ते 15 संपर्क माहिती (मोबाइल किंवा लँडलाईन नंबर) दिली जातील जी कार्यालयातून गोळा करावी लागतील किंवा ईमेल पाठवत असतील. कृपया नमूद केले Reg. तुमच्या सर्व पत्रव्यवहारात आयडी. सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही सदस्याचा कोणताही पोस्टल पत्ता शेअर केला जाणार नाही.
4 . मी अभिनंदन वधू वर सूचक केंद्राला दिलेली सर्व माहिती अभिनंदन वधू वर सूचक केंद्र अनुरूप स्थळांना पुरवू शकतात, त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करू शकतात अथवा इतर माध्यमांद्वारे एक अथवा अनेकांना पुरवू शकतात याच मला जाणिव असून त्यासाठी माझी परवानगी आहे.
5 . शॉर्ट लिस्ट केलेल्या प्रोफाइलच्या तपशीलांची पडताळणी करणे ही सदस्यांच्या पालकांची/ नातेवाईकांची जबाबदारी आहे. लग्नानंतर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास मॅरेज ब्युरो किंवा ब्युरोचा मालक जबाबदार राहणार नाही.
6 . अभिनंदन वधू वर सूचक केंद्र नोंदणीकृत व्यक्तींना अनुरूप स्थळे सुचविण्याचे काम करते, यासाठी जे काही सेवा शुल्क घेतले जाते ते ना परत शुल्क आहे याचा मला जाणीव असून ते मला मान्य आहे.
7 . अभिनंदन वधू वर सूचक केंद्राच्या सर्व सेवांविषयी मला माहिती असून, या सर्व सेवांच्या नियम व अटी मला मान्य आहेत.
8 . अभिनंदन वधू वर सूचक केंद्राच्या प्रिमियम सेवेमध्ये वधू आणि वर यांचा लग्नासाठी संमती मिळेपर्यंतच अभिनंदन वधू वर सूचक केंद्राची जबाबदारी राहील याची मला माहिती असून हे मला मान्य आहे.
9 . अभिनंदन वधू वर सूचक केंद्राच्या व्यतिरिक्त इतर संस्था अथवा व्यक्तीकडून माझे अथवा मी नोंदणी केलेल्या वधू/वरचे लग्न जमल्यास अभिनंदन वधू वर सूचक केंद्राने आकारलेले सेवा शुल्क मला परत मागण्याचा अधिकार नाही आणि मी ते सेवा शुल्क पुन्हा मागणार नाही तसेच इतर ठिकाणावरून लग्न जमल्यास अभिनंदन वधू वर सूचक केंद्राला सदर गोष्टीची कल्पना देणे माझ्यावर बंधनकारक असून हे मला मान्य आहे.
10. नवीन नोंदणी किंवा मुदतवाढ केल्यास त्या निगडित रक्कम भरावी लागेल.
11. समोरील स्थळाकडून काही अडचण येत असल्यास त्वरित संस्थेला कळवावे.
12. अभिनंदन वधू वर सूचक केंद्र यांच्या सर्व नियम व अटी मला मान्य असून त्यांचे पालन करण्यास मी बद्ध आहे.
13. आपल्याला आवडलेल्या स्थळा विषयी माहिती हवी असल्यास ११:०० ते ६:०० या वेळेतच संपर्क करावा.
14. लग्न ठरल्यास अभिनंदन वधू वर सूचक केंद्रास योग्य ते मानधन द्यावे लागेल.